Gold Silver Rate on 26 October 2023 : सणासुदीच्या हंगामाची सुरुवात होताच सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढते. जर तुम्ही देखील सोने-चांदी (Gold Silver Rate) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज सोने आणि चांदी दोन्हीचे भाव वाढले आहेत. आज सोन्याचा भाव ६१,००० रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे, तर चांदीही ७२,००० रुपयांच्या वर (Silver Price Today) आहे. गुरुवारी सोन्याचा दर ६०,८२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला. यानंतर त्याच्या किमतीत आणखी वाढ झाली आहे. दुपारच्या सत्रात तो कालच्या तुलनेत ९१ रुपये म्हणजेच ०.१५ टक्क्यांनी वाढून ६०,९१७ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​व्यवहार करीत होता. काल फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव ६०,८२६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाला.

चांदी ७२ हजार रुपयांच्या पुढे गेली

सोन्याव्यतिरिक्त चांदीमध्येही आज तेजीचा व्यवहार होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आज चांदी ७१,७९९ रुपयांच्या पातळीवर उघडली. यानंतर आणखी वाढ नोंदवली गेली आणि कालच्या तुलनेत २२२ रुपये म्हणजेच ०.३१ टक्के वाढीसह ते ७२,००९ रुपये प्रति किलोच्या पातळीवर राहिले. काल मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदी ७१,७८७ रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Forfeiture action by Vasai virar Municipal corporation against property owners who keep arrears of property tax
मालमत्ता थकबाकीदारांना पालिकेचा दणका; पालिकेकडून मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरवात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
नावातील साधर्म्याचा फायदा घेऊन १६ कोटींच्या शेअर्सची परस्पर विक्री
Due to lack of fitness certificates thousands of vehicles are stuck affecting transportation of essential goods Mumbai news
फिटनेस प्रमाणपत्रे नसल्याने हजारो वाहने अडकली; अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर परिणाम
Victim Aryan Mishra
Aryan Mishra Murder: गायीच्या तस्करीच्या संशयावरून गोरक्षकांनी केली १२वी च्या विद्यार्थ्याची हत्या; ३० किमीपर्यंत केला पाठलाग
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
pimpari young man attacked by koytta
गणेशोत्सवाची वर्गणी गोळा करण्यावरून तरुणावर कोयत्याने वार; कुठे घडली घटना?

प्रमुख शहरांमध्ये २६ ऑक्टोबर २०२३ला सोने-चांदीचा दर किती?

दिल्ली- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
कोलकाता- २४ कॅरेट सोने ६१,९६० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
मुंबई- २४ कॅरेट सोने ६१,९६० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
चेन्नई- २४ कॅरेट सोने ६२,२०० रुपये, चांदी ७८,००० रुपये प्रति किलो
पाटणा- २४ कॅरेट सोने ६२,०१० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
जयपूर- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
नोएडा- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
गुरुग्राम- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
गाझियाबाद- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
लखनौ- २४ कॅरेट सोने ६२,११० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो
पुणे- २४ कॅरेट सोने ६१,९६० रुपये, चांदी ७५,१०० रुपये प्रति किलो

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची किंमत वाढली

देशांतर्गत बाजाराशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. धातूच्या रिपोर्टनुसार, आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ०.४ टक्क्यांच्या वाढीसह १,९८६.७९ प्रति औंस डॉलर पातळीवर आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास आज त्याच्या किमतीतही वाढ होत आहे आणि ०.२ टक्क्यांच्या वाढीसह तो २२.९३ प्रति औंस डॉलर या पातळीवर आहे. इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धानंतर सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. गुंतवणूकदार सोन्याचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार करीत आहेत.