गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. बुधवारी संध्याकाळी सोन्याचा भाव ६० हजारांच्या पुढे गेला होता, त्यावेळी २४ तासांत ही किंमत कमी होईल, यावर कोणाचाही विश्वास बसला नसता. आज सकाळी बाजार उघडताच सोन्याची सुरुवात ३५० रुपयांच्या घसरणीने झाली. व्यवहारादरम्यान सोन्याने एकदा ६० हजार रुपयांची पातळी गाठली होती, मात्र नंतर त्याचा दर खाली खाली येत गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या गुंतवणूकदारांनी किंचित प्रॉफिट बुकिंग केले आहे, त्यामुळे थोडीशी घसरण दिसून येत आहे. इस्रायल-हमास युद्धाचा ज्वर अजूनही कायम आहे. पाश्चात्य नेत्यांकडून सातत्याने येत असलेल्या वक्तव्यांमुळे मध्यपूर्वेत सातत्याने तणाव वाढत आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः Money Mantra : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढला, पगार अन् पेन्शन किती वाढणार? गणित समजून घ्या

भारतात सोने स्वस्त झाले?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेचार वाजता सोन्याचा भाव १०८ रुपयांनी घसरून ५९९६५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​होता. तर आज सोन्याचा भाव ३५० रुपयांच्या घसरणीसह ५९,७२० रुपयांवर उघडला. एक दिवसापूर्वी सायंकाळी सोन्याचा भाव ६० हजार रुपयांच्या पुढे गेला होता. त्यानंतर रात्री उशिरा बाजार बंद भाव ६०,०७३ रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आला.

हेही वाचाः Nokia Layoffs : दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी नोकिया आता करणार नोकर कपात, १४ हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार जाणार

चांदीही स्वस्त झाली

दुसरीकडे चांदीच्या दरातही थोडीशी घसरण दिसून आली. मिळालेल्या माहितीनुसार, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीचा भाव प्रतिकिलो ७६ रुपयांच्या घसरणीसह ७१,८१९ रुपयांवर व्यवहार करीत आहे. मात्र, आजच्या व्यवहारात चांदीने ७२ हजार रुपयांची पातळी ओलांडली असून, भावाने ७२,२०० रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला आहे. मात्र, आज सकाळी चांदी ७१,८०१ रुपयांच्या घसरणीसह उघडली.

परदेशी बाजारातही मंदी कायम

परदेशी बाजारातही सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आकडेवारीनुसार, न्यूयॉर्कच्या कॉमेक्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव प्रति औंस ५.५० डॉलरच्या घसरणीसह १,९६२.८० प्रति औंसवर व्यवहार करीत आहे. तर सोन्याच्या स्पॉटची किंमत प्रति औंस ३.३२ डॉलरच्या किंचित वाढीसह १,९५०.८७ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करीत आहे. चांदीचा भाव प्रति औंस २३.०६ डॉलरवर स्थिर व्यवहार करीत आहे आणि चांदीचा स्पॉट प्रति औंस २२.९१ डॉलरवर व्यापार करीत आहे.

शहर २२ कॅरेट सोन्याचा दर २४ कॅरेट सोन्याचा दर

मुंबई ५५,७०० ६०,७६०
गुरुग्राम ५५,८५० ६०,९१०
कोलकाता ५५,७०० ६०,७६०
लखनौ ५५,८५० ६०,९१०
बंगलोर ५५,७०० ६०,७६०
जयपूर ५५,८५० ६०,९१०
पाटणा ५५,७५० ६०,८१०
भुवनेश्वर ५५,७०० ६०,७६०
हैदराबाद ५५,७०० ६०,७६०

अशा प्रकारे सोन्याचे भाव ठरवले जातात

सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतात. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होणार आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold rate today within 24 hours the price of gold fell below 60 thousand rupees 19 october 2023 how cheap did gold and silver become vrd
Show comments