Gold Silver Price : तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये लग्न समारंभाशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. लग्न म्हटले की सोने खरेदी आली. सोने खरेदीवर लोकांचा जोर वाढल्यामुळे सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. आज तर सोने चांदीचा दर वाढलेला दिसत आहे. तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या.

सोने चांदीचा दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,३८२ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,७८० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९२८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९२,८३० रुपये प्रति किलो आहे.
५ डिसेंबरच्या आकडेवारीच्या तुलनेत आज सोने २६० रुपयांनी महागले आहेत तर चांदी ६०० रुपयांनी महागली आहे.

Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
Bangladesh pulled plug on key internet deal with India
भारताला मोठा धक्का; बांगलादेश आणि भारताचा इंटरनेट करार…
Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या
Gold prices decreased but consumers tension grew due to significant rise in silver prices
सोन्याच्या दरात घट, चांदीने वाढवली चिंता… हे आहेत आजचे दर…
sarees and jewellery combination jewellery to wear with saree jewellery set for saree
अलंकृत!
Gold Silver Price 4 december 2024 On Google Trends
Gold Silver Rate Today : सोनं स्वस्त झालं की महाग? आठवड्याभरात सोन्या- चांदीच्या दरात काय झाले बदल? घ्या जाणून
nagpur 10 gram gold price
सुवर्णसंधी! सोन्याचा भाव पुन्हा उतरला… तीनच दिवसांत…
Today’s Gold Silver Price 2 december 2024 | Gold Silver Rate fall Down today
Gold Silver Rate Today : ऐन लग्नससराईत सोन्या-चांदीचे दर गडगडले, खरेदीपूर्वी आजचा भाव किती एकदा पाहाच

हेही वाचा : ‘ईपीएफओ’ची समभागसंलग्न गुंतवणूक २४.७५ लाख कोटींवर

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,२५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,६४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२५३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६४० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

हेही वाचा : सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला; नोव्हेंबरमध्ये पीएमआय निर्देशांकाची ५८.४ गुणांवर घसरण

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader