Gold Silver Today’s Price : नुकताच गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला. गणेशोत्सव दरम्यान सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून आली होती. मागील काही दिवसांपासून सलग सोने चांदीचे दर वाढले होते पण आज अचानक सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोने चांदीचे दर घसरले आहे. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. तुम्ही जर सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस उत्तम आहे.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६७,२१० रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७३,३२० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८८५ रुपये आहे म्हणजेच चांदी ८८,५०० रुपये किलोनी विकली जात आहे.

Gold Silver Price
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांना धक्का! जाणून घ्या मुंबई-पुण्यातील १० ग्रॅमची किंमत
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Gold-Silver Price today 8 September 2024
Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोनं खरेदीचा विचार करताय? मग पाहा तुमच्या शहरातील आजचा सोने-चांदीचा दर
Gold-Silver Price
Gold-Silver Price: सोने घसरणीनंतर किमतींमध्ये झाले मोठे बदल, पाहा मुंबई-पुण्यात काय सुरुये १० ग्रॅमचा भाव 
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Gold Silver Price Today in Marathi| Gold Silver Rate Today in Marathi
Gold Silver Price Today : सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! जाणून घ्या तुमच्या शहरातील २२ कॅरेट सोन्याचा दर
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Gold prices decreased on Wednesday after Ganeshotsav
सुवर्णवार्ता… गणेशोत्सव संपताच सोन्याच्या दरात घसरण.. हे आहेत आजचे दर…

मंगळवारी दहा ग्रॅम सोन्याचा दर ७२,९९५ रुपये होता तर चांदीचा दर ८८,५५१ रुपये किलो होता.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,१०० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,२०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१०० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२०० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१०९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२१० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,१०९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,२१० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

हेही वाचा : बजाज हाउसिंग फायनान्सच्या समभागात पदार्पणालाच १३६ टक्के वाढ, वर्षातील चौथी सर्वोत्तम सूचिबद्धता

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.