Gold Silver Rate Today : सणावाराच्या दिवसांमध्ये सोने चांदीचे दर वाढतात, ही सामान्य गोष्ट आहे पण यंदा दिवाळीत सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांक गाठला आहे. दिवाळीमध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी सोने खरेदी करण्यासाठी लोक आतापासून बुकींग करत आहे. धनत्रयोदशीला अवघे काही दिवसच शिल्लक आहे आणि सोन्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२,२०६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७८,७७० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९७५ रुपये आहे म्हणजेच चांदी ९७,५१० रुपये प्रति किलो आहे.

हेही वाचा : मुंबईत वाढत्या घरभाड्यांमुळे ‘ब्रेन-ड्रेन’ होतंय, लोक कमावतायत कमी आणि भाडी भरतायत जास्त!

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,०७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,६४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,०७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६३० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,०७८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६३० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,०७८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६३० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

हेही वाचा : युनियन बँकेवर वित्तीय गुप्तचर यंत्रणेकडून ५४ लाखांचा दंड; मुंबईतील शाखेतील संशयास्पद व्यवहारांच्या देखरेखीत अपयशाचा ठपका

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver price gold hike on 79 thousand gold silver rate 26 october 2024 ndj