Gold Silver Rate on Valentine’s Day : ऐन ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी सोने चांदी महागले! सोन्याचा आकडा ८६ हजारांच्या पार! वाचा, तुमच्या शहरातील तरआज व्हॅलेंटाईन दिवस म्हणजेच प्रेमाचा दिवस आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला सोन्या चांदीचे दागिने गिफ्ट करायचा विचार करत असाल तर आज आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज ऐन व्हॅलेंटाईन डे ला सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची ८६,३३० रुपये आहे तर चांदीचा दर ९७,०५० प्रति किलो आहे. सोने चांदीच्या दरातील तेजीने ग्राहकाच्या खिशाला कात्री बसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजचा सोने चांदीचा दर

आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८६,३३० रुपये तर चांदीचा दर ९७,०५० रुपये किलो आहे. बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७९,१३६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ८६,३३० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९७१ रुपये आहे म्हणजेच चांदी ९७,०५० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. गेल्या महिन्याभरात सोने जवळपास सात हजार रुपयांनी वाढले आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७९,०५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८६,३३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७९,०५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८६,३३० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७९,०५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८६,३३० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७९,०५३ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ८६,३३० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.