Today’s Gold Silver Rate : येत्या ३० मार्च रोजी महाराष्ट्रात गुढीपाडवा उत्साहाने साजरा केला जाणार आहे. गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाची सुरूवात असते. या दिवशी लोक आवडीने सोने चांदीचे दागिने खरेदी करतात अवघ्या दोन दिवसांवर गुढीपाडवा असल्याने बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी दिसून येत आहे. ग्राहकांच्या वाढत्या मागणीला लक्षात घेऊन सोने चांदीचे दर सुद्धा वाढले आहे.
आज सोने दर ४५० रुपयांनी वाढला असून चांदी चक्क ३८० रुपयांनी महागली आहे. तुम्ही सोने चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा दर जाणून घ्या.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ८१,१७१ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ८८,५५० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत १००१ रुपये आहे म्हणजेच चांदी १००११० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. गेल्या काही दिवसातील हे सर्वाधिक आकडे आहेत. सोने चांदीचे वाढते दर पाहून ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८०,९१४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८८,२७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,४९३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८७,८१० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,४९३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर८७,८१० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,४९३ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ८७,८१० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात