Today’s Gold Silver Price : सोन्या-चांदीचे दर दिवसेंदिवस नवा उच्चांक गाठत आहे, लवकरच सोन्याचा दर ८७ हजारांच्या पार जाण्याची चिन्ह दिसत आहेत. यात गुरुवारी देखील सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ही भारतात सध्या ८६,००० रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. आज सकाळी ९.३० वाजेपर्यंत सोन्याच्या किंमतीमध्ये ३६० रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात २४० रुपयांची वाढ झाली आहे. देशात आजच्या घडीला चांदीचा दर ९६,०५० रुपये आहे. पण आज तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर नेमके काय आहेत जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 13 February 2025)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ८६,००० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७८,८३३ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९६१ रुपये आहे तर १ किलो चांदी ९६,०५० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या- चांदीच्या दरात चढ-उतार झाले आहेत.

आदल्या दिवशीचा म्हणजे २७ जानेवारी २०२५ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८५,६४० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९५, ८१० रुपये होता. यावरुन तुमच्या लक्षात येईल की, आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज ३३० रुपयांनी तर चांदी १६० रुपयांनी वाढले आहेत.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८५,९१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे.
नागपूर२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे.
नाशिक२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७८,७५१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८५,९१० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.