Today’s Gold Silver Price : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या- चांदीच्या दरात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. वर्ष २०२५ च्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर ७८, ६९० रुपयांवर असलेला सोन्याचा दर आज ७९, ५२० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर ९२ हजारांवरुन आता ९३ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. आठवड्याभराचा विचार केल्यास २४ कॅरेट सोन्याचा दर ८३० रुपयांनी वाढला आहे, तर १ किलो चांदीचा दर ९२,६०० वरुन ९२,९२० रुपयांवर पोहोचला आहे.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 17 January 2025)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७९,३५० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७२,७३८ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९२६ रुपये आहे तर १ किलो चांदी९२,५८० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्या-चांदीचे दरात वाढ झाल्याची दिसून आली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या- चांदीच्या दरात चढ-उतार झाले आहेत.
आदल्या दिवशीचा म्हणजे १६ जानेवारी २०२५ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,५२० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९२, ९२० रुपये होता. यावरुन तुमच्या लक्षात येईल की, आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज १७० रुपयांची कमी झाला आहे, तर चांदी जवळपास ३४० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७२,५६२ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७९,१६० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६२ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,१६० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६२ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,१६० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७२,५६२ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७९,१६० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.