Today’s Gold Silver Price आयात शु्ल्क कमी केल्यानंतर सोने-चांदीचे दर आटोक्यात येतील अशी आशा होती. मात्र गणेशोत्सव काळापासून सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठे बदल पाहायला मिळत आहे. सोने- चांदीच्या दराने उच्चांकीच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. आज सोन्याच्या ७४ हजारांचा आकडा पार केला आहे. तर दररोज होणारी ही दरवाढ पाहता चांदीने जवळपास ९० हजारांचा टप्पा गाठला आहे. पुढच्या काही दिवसांत चांदीचे दर लाखाच्या घरात पोहोचतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचा दर जवळपास १३०० रुपयांनी वाढला आहे, तर चांदीच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर आज सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या.

आज २४ सप्टेंबर रोजी देशात आज सोने- चांदीच्या दरात पुन्हा मोठे चढ- उचार दिसून आले आहेत. आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,८०० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८९,८३० रुपये आहे. आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचा दर ७३ ते ७४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत, तर तर चांदीचे दर ८७ ते ८९ हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे दिसून येत आहे.

Sensex Today crossed 85000 mark in bse nifty 50 reached over 25000
Sensex Today: सेन्सेक्सची उसळी! ८५ हजारांचा विक्रमी टप्पा पार, निफ्टीनंही गाठला उच्चांक!
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Akshay Shinde Mother and Father
Akshay Shinde Encounter : “अक्षयचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, कारण…”; आई वडिलांनी नेमकं काय म्हटलं आहे?
badlapur rape accused Akshay Shinde killed What Sanjay Raut said
Akshay Shinde Encounter: ‘याने पोलिसांवर हल्ला केला?’, एन्काऊंटरच्या आधीचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम

हेही वाचा – दोन लाख डाऊन पेमेंट करा अन् घरी आणा Maruti suzuki Brezza CNG; जाणून घ्या EMI किती?

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 24 September 2024)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७४,८०० रुपये आहे,तर २२ कॅरेटचे दर ६७,५६७ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ८९८ रुपये आहे तर १ किलो चांदी८९,८३० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत सोन्या-चांदीचे दरात वाढ झाल्याची दिसून आली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या- चांदीच्या दरात चढ-उतार झाले आहेत.

आदल्या दिवशीचा म्हणजे २३ सप्टेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,६६० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ८९,२२० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज १४० रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी जवळपास ६१० रुपयांनी महागली आहे.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६८,५५८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,७९०
प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५५८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७९० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५५८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७९० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५५८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७९० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.