Today’s Gold Silver Price : सणासुदीच्या काळात भारतात सोने- चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसतोय, पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने एक मोठा उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली, त्यामुळे सोने- चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा मात्र हिरमोड होताना दिसतोय. ऑगस्ट आणि सप्टेंबरचा विचार केल्यास या दोन महिन्यात, २४ कॅरेट सोन्याचा दर ७१ हजारांवरुन आज ७५ हजारांच्या पार पोहोचला आहे. तर चांदीचा दरही ८४ हजारांवरुन आज ९२ हजारांवर पोहोचला आहे, यावरुन तुम्ही कळले असेल की, सोन्या-चांदीचे दर किती वेगाने वाढतायत. पण आज २७ सप्टेंबर २०२४ रोजी सोने- चांदीच्या दरात किंचित घट झाली आहे. १० ग्रॅम सोन्याच्या दरात २१० रुपयांची तर चांदीच्या दरात २६० रुपयांची घसरण झाली आहे. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्याचे दर काय आहेत जाणून घेऊ….

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 27 September 2024)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २४ सप्टेंबर रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,५८० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९२,३८० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ६९,२८२ रुपये आहे याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९२४ रुपये आहे.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार
Larvae found in oranges
महिलांनो तुम्हीही बाजारातून संत्री विकत घेताय का? थांबा! ‘हा’ VIDEO पाहून संत्री घेताना आता १०० वेळा विचार कराल
petrol Diesel price Marathi news
Daily Fuel Prices Change : आज महाराष्ट्रात कमी झाले पेट्रोल-डिझेलचे भाव, पाहा तुमच्या शहरांत काय आहे स्थिती?
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,१६३रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,४५०
प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१६३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१६३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१६३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४५० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

CIDCO Lottery 2024 : सिडको लॉटरीसाठी कसा करावा ऑनलाइन अर्ज? आवश्यक कागदपत्रं अन् पात्रता काय? सर्वकाही वाचा एका क्लिकवर

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

Story img Loader