Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात घसरण दिसून आली होती पण लग्नसराई सुरू होताच सोने चांदीचे दर पुन्हा वाढले आहेत. त्यामुळे तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या.

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,७५८ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,१०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ८९० रुपये आहे म्हणजेच चांदी ८९०३० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. मंगळवारी चांदीचा दर ८८,२२०रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७५,४२० रुपये होता. एका दिवसात सोने ६८० रुपयांनी महागले तर चांदी ८१० रुपयांनी महागली आहे.

Maharashtra Live News Update: Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live Updates| Maharashtra Government Swearing-in Ceremony Live Updates|
Maharashtra Vidhan Sabha Election Result Live Updates : महाविकास आघाडी फुटणार? आगामी निवडणुकांत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा सूर!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Sanjay Raut on Former CJI DY Chandrachud
“माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जाता जाता…”, संजय राऊत यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘त्यांना काही कळते का?’
maharashtra assembly election quiz
Election Quiz: मुख्यमंत्री कोण होणार? हे माहीत नसले तरी याआधी कोण झाले? या प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका स्मार्टफोन
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Gold Silver Price Today 08 November 2024 in Marathi
Gold Silver Price Today : लग्नसराईपूर्वी सोने -चांदीच्या दरात घसरण! जाणून घ्या आजचा तुमच्या शहरातील दर
eknath shinde and devendra fadavis
शिंदे यांची माघार? मुख्यमंत्रीपदाचा देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा

हेही वाचा : बाह्य कर्जांविना वाढ साधण्याचा अदानी समूहाचा दावा; गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी आर्थिक सुस्थितीची ग्वाही

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९७६८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६, ११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,१२० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,१२० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७७७ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ७६,१२० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

एका महिन्यापूर्वी १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७८७५० रुपये होता तर चांदीचा तर ९७,६५० रुपये होता.
तसेच, एका आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ७६,३३० रुपये होता तर चांदीचा दर ९०,३७० रुपये होता.

हेही वाचा : December 2024 Bank Holidays : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात १७ दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.