Today’s Gold Silver Price : वर्षाच्या सुरुवातीपासूनचं सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ- उतार पाहायला मिळत आहे. वर्ष २०२५ च्या पहिल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर ७८ हजारांच्या दरम्यान होता, पण तोच दर महिन्याच्या शेवटी ८० हजारांच्या पार गेला आहे. पण चांदीच्या दरात मात्र घट झाली आहे. चांदी ९३ हजारांवरुन आज ९० हजारांवर पोहोचली आहे. आदल्या दिवशीच्या तुलनेत (२७ जानेवारी २०२५) आज २४ कॅरेट सोन्याचा दर आज १८० रुपयांनी वधारला आहे. तर चांदीच्या दरात १२० रुपयांची वाढ झाली आहे.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 28 January 2025)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ८०,२०० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७३,५१७ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९०७ रुपये आहे तर १ किलो चांदी ९०,६५० रुपयांनी विकली जात आहे. त्यामुळे आज गेल्या आदल्या दिवशीच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या- चांदीच्या दरात चढ-उतार झाले आहेत. पण या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…
आदल्या दिवशीचा म्हणजे २७ जानेवारी २०२५ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८०,०२० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९०, ५३० रुपये होता. यावरुन तुमच्या लक्षात येईल की, आज सोन्याचे दर कालच्या तुलनेत आज १८० रुपयांनी तर चांदी १२० रुपयांनी वाढले आहेत.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७३,३७० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,०४० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७३,३७० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८०,०४० रुपये आहे. |
नागपूर | २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७३,३७० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८०,०४० रुपये आहे. |
नाशिक | २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७३,३७० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८०,०४० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
© IE Online Media Services (P) Ltd