Today’s Gold Silver Price : मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनचं देशात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोठी आणि मागणी- पुरवठ्यातील बदलांमुळे सोन्या- चांदीच्या किमतींवर परिणाम होतो. यात आता लग्नसराई आणि सणसमारंभाचे दिवस सुरु असल्याने ग्राहकांचा सोने खरेदीकडे अधिक कल असतो. त्यामुळे किमतीत वाढ दिसून येत आहे. सध्याच्या घडीला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८९ हजारांच्या पार गेला आहे, तर १ किलो चांदीचा दरही ९८ हजारांवर पोहोचला आहे, पण तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ..

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 3 April 2024)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज १४ एप्रिल २०२५ रोजी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८९, ३५० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९७,८५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८१,९०४ रुपये आहे याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर ९८९ रुपये आहे. दरम्यान कालच्या तुलनेत सोन्याच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही, पण चांदीचा दर मात्र २२८० रुपयांनी घसरला आहे. पण तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७५८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८९,१९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८१,७५८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१९० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८१,७५८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१९० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८१,७५८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१९० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.