Gold Silver Rate Today : सध्या देशभरात नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवदरम्यान अनेक जण कपडे, दागिने खरेदी करताना दिसत आहे. नवरात्रीदरम्यान तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कारण आज सोने चांदीच्या दरात थोडी घसरण झाली आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सोन्याचे भाव गगनाला भिडले होते त्यामुळे नवरात्रोत्सव-दसरा दरम्यान सोने चांदीचा दर आणखी वाढेल, अशी सर्वांना भीती होती. पण नवरात्रीदरम्यान सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. (Gold silver price today 7 october 2024)
सोने चांदीचे दर (Gold Silver Rate)
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,७४० रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,०८० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९३३ रुपये आहे म्हणजेच चांदी ९३,२५० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. रविवारी चांदीचा दर ९३,५९० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७६,२६० रुपये होता.
हेही वाचा : ‘इंडिया ज्वेलरी पार्क’ला मुद्रांक शुल्कात राज्य सरकारकडून सवलत
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,६६७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६००० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,६६७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६००० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,६५८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,९९० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,६५८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,९९० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.