Gold Silver Price Today 5 january 2025 : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. वर्ष २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार ७४० रुपये होता, जो आता २०२५ च्या पहिल्या आठवड्यात ७७ हजार ५७० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. तर चांदीचे दरही ८८ हजारांवरुन ८९ हजारांवर पोहोचले आहे, यात नवीन वर्षात लग्नसराईचे अनेक मुहूर्त असल्याने सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. अशाच आज ५ जानेवारी २०२५ रोजी मुंबई, पुणे, नागपूरसह महत्वाच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा दर नेमका किती आहे जाणून घ्या…
देशात आज सोन्याचे-चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 5 january 2025)
इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज ३० डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, म्हणजे २६ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याच्या ११० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच चांदीचा दरही वाढला आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,०६० रुपये आहे, २९ डिसेंबरच्या तुलनेत हे दर १४० रुपयांनी कमी झाले आहेत.
इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज ५ जानेवारीला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७७,५७० रुपये नोंदवण्यात आला आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,१०६ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला.आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार ७४० रुपये इतका होता.
दरम्यान चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,३६० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ८८,९२० रुपये होता. पण वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ पाहून ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम) | २४ कॅरेट सोन्याचा दर ( प्रति १० ग्रॅम) |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत ७०,९७८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,४३० आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,९७८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,४३० रुपये इतका आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,९७८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,४३० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,९७८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,४३० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, महिन्याभरापूर्वी म्हणजे डिसेंबर २०२४ मध्ये देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार ७२० रुपये होता.म्हणजे एका महिन्यात सोन्याचे दर जवळपास ८०० रुपयांनी वाढला आहे.
तसेच १ किलो चांदीचा दर महिन्याभरापूर्वी ९२ हजार ३२० रुपये होता, जो आज ८९ हजार ३६० रुपये झाला आहे त्यामुळे चांदीच्या दरही वर्षभरात तब्बल ४ हजार रुपयांनी वाढला आहे.