Gold Silver Price Today : २०२४ वर्ष संपण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. या वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसले, २०२४ च्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दरात वाढ झाली, यात मध्यंतरीच्या काळात म्हणजेच गणेशोत्सव आणि दिवाळीच्या दरम्यान २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ८० हजार पार पोहोचला होता, तर १ किलो चांदीचा दरही ९० हजारांचा पार होता. त्यामुळे सोनं- चांदी खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती.

मात्र मागील महिन्याभरापासून सोन्याचा दर कमी अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे, गेल्या महिन्याभराचा विचार केल्यास २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ ते ७७ हजारांच्या दरम्यान कमी जास्त होत आहे. तर चांदीचा दर ९० ते ८८ हजारांच्या दरम्यान राहत आहेत. सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे जागतिक पातळीवरील घडामोडी आणि देशातील लग्नसराईच्या काळ हे देखील कारण सांगितले जात आहे. परंतु आज ३० डिसेंबर २०२४ रोजी मुंबई, पुणे, नागपूरसह महत्वाच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर किती आहेत जाणून घेऊ…

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 30 December 2024)

Sprouted coconuts What they are and if its advisable to have them
अंकुरलेले नारळ म्हणजे काय? ते खाणे योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात…
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
sonu bhide aka Jheel Mehta wedding video
‘तारक मेहता..’ फेम ‘सोनू भिडे’ अडकली लग्नबंधनात, बाबाची भूमिका करणारा मंदार चांदवडकर माफी मागत म्हणाला…
a child told amazing message for tension free life
“लोकांचा जास्त लोड नाही घ्यायचा..” गोंडस चिमुकलीने सांगितला टेन्शन फ्री जगण्याचा कानमंत्र, VIDEO एकदा पाहाच
prajakta mali reaction after suresh dhas apology
सुरेश धस यांच्या दिलगिरीनंतर प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, “अत्यंत मोठ्या मनाने माफी मागितल्यामुळे…”
Image of Dr. Manmohan Singh
Dr. Manmohan Singh : “डॉक्टर साहेब त्या Maruti 800 कडे पाहतच रहायचे”, मनमोहन सिंग यांचे सुरक्षा रक्षक राहिलेल्या मंत्र्याची भावूक पोस्ट
prajakta mali on suresh dhas (1)
Prajakta Mali: प्राजक्ता माळीनं सुरेश धसांबाबत मांडली सडेतोड भूमिका; “ज्या कुत्सितपणे विधान केलंत, तेवढ्याच विनम्रपणे माफी मागा”!
Curry Leaves Benefits
हिवाळ्यात रिकाम्या पोटी कढीपत्ता खाण्याचे जबरदस्त फायदे; केसगळतीसह ‘हे’ विकार होतील दूर

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज ३० डिसेंबर २०२४ रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, म्हणजे २६ डिसेंबरच्या तुलनेत सोन्याच्या ११० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच चांदीचा दरही वाढला आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,०६० रुपये आहे, २९ डिसेंबरच्या तुलनेत हे दर १४० रुपयांनी कमी झाले आहेत.

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज ३० डिसेंबरला सकाळी ११ वाजता २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,८५० रुपये नोंदवण्यात आला आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४४६ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला. आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ हजार २७० रुपये इतका होता.

दरम्यान चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीचा दर ८९,०६० रुपये नोंदवला गेला आहे. दरम्यान आठवड्याभरापूर्वी १ किलो चांदीचा दर जवळपास ८९,०८० रुपये होता. पण वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरात झालेली वाढ पाहून ग्राहक चिंता व्यक्त करत आहेत.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर (प्रति १० ग्रॅम)२४ कॅरेट सोन्याचा दर ( प्रति १० ग्रॅम)
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत ७०,२५३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,६४० आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२८१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६७० रुपये इतका आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२८१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६७० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,२८१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,६७० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, ३१ डिसेंबर २०२३ रोजी देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ६३ हजार ३७० रुपये होता, जो आज ३० डिसेंबर २०२४ रोजी जवळपास ७६ हजार ७४० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजे वर्षभरात सोन्याचे दर जवळपास १३ ते १४ हजारांनी वाढला.

तसेच १ किलो चांदीचा दर ३१ डिसेंबर २०२३ रोजी ७४ हजार ४४० रुपये होता, जो ३० डिसेंबर २०२४ रोजी ८८ हजार ९२० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे चांदीच्या दरही वर्षभरात तब्बल १६ ते १७ हजार रुपयांनी वाढला आहे.

Story img Loader