Gold Silver Price Today : २०२४ वर्ष संपण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. या वर्षभरात सोन्या-चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसले, २०२४ च्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दरात वाढ झाली, यात मध्यंतरीच्या काळात म्हणजेच गणेशोत्सव आणि दिवाळीच्या दरम्यान २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ८० हजार पार पोहोचला होता, तर १ किलो चांदीचा दरही ९० हजारांचा पार होता. त्यामुळे सोनं- चांदी खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती.
मात्र मागील महिन्याभरापासून सोन्याचा दर कमी अधिक प्रमाणात वाढताना दिसत आहे, गेल्या महिन्याभराचा विचार केल्यास २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७६ ते ७७ हजारांच्या दरम्यान कमी जास्त होत आहे. तर चांदीचा दर ९० ते ८८ हजारांच्या दरम्यान राहत आहेत. सोन्या-चांदीच्या किमती वाढण्यामागे जागतिक पातळीवरील घडामोडी आणि देशातील लग्नसराईच्या काळ हे देखील कारण सांगितले जात आहे. परंतु आज ३० डिसेंबर २०२४ रोजी मुंबई, पुणे, नागपूरसह महत्वाच्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर किती आहेत जाणून घेऊ…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा