Union Budget 2025 Today’s Gold Silver Rate :  आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, पण अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्या-चांदीने विक्रमी दर गाठला आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्या – चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, देशात सोन्या- चांदीचे दर उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. आठवड्याभरात सोन्याचा दर ८० वरुन थेट ८२ हजारांपर्यंत पोहोचला आहे. तर चांदीच दर ९१ हजारांवरुन थेट ९४ हजारांवर पोहोचला आहे. तसेच आजही सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पण तुमच्या शहरात आज नेमके काय दर आहेत जाणून घेऊ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज १ फेब्रुवारी रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ८२, ५२० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९३,९१० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे दर ७५ हजार ६४३ रुपये झाला आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याचा दरात गेल्या आठवड्याभरात २००० हजारांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर ३००० वाढले आहेत. दरम्यान कालच्या तुलनेत सोन्याचा दर २१० रुपयांनी वाढला आहे. तर चांदी ३५० रुपयांनी घटला आहे. दरम्यान आजच्या अर्थसंकल्पानंतर सोन्याच्या चांदीच्या वाढत्या दरांवर नेमका काय बदल होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७५,५०६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८२,३७०प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७५,५०६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८२,३७० रुपये आहे.
नागपूर२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७५,५०६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८२,३७० रुपये आहे.
नाशिक२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७५,५०६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८२,३७० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.