Gold Silver Price Today : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ साठी आज (२० नोव्हेंबर) रोजी सर्वत्र मतदान होत आहे. मात्र मतदानाच्या आदल्या दिवसापासूनच देशात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी दिसून आली. सोन्याचे दर आज ७६ हजारांच्या आसपास पोहोचले आहेत. १९ नोव्हेंबच्या तुलनेत आज सोन्याचा दरात कोणतेही बदल झाले नाही, मात्र १८ आणि १९ नोव्हेंबरच्या तुलनेत हे दर जवळपास १२०० रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या दिवसात सोन्या-चांदीच्या दरातील हा चढ-उतार पाहून ग्राहकांनी चिंता व्यक्त केली आहे.आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ….

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 20 November 2024)

आज २० नोव्हेंबर रोजी देशात सोन्या-चांदीचे दर वाढल्याचे दिसून आले, दरम्यान पुन्हा वाढलेले हे दर पाहता सर्वसामान्यांना सोने-चांदी खरेदी करणे आवाक्याबाहेर आहे. आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७५ हजार ९२० रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर ९१ हजार ०४० रुपये आहे. एका आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचे दर ७४ हजार ७५० रुपयांवरुन आज पुन्हा ७५ हजार ९२० रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचे दर ८९ हजार ५८० रुपयांवरुन आज ९१ हजार ०४० रुपयांवर पोहोचला आहे.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
shukra guru make navpancham yog
नवपंचम राजयोग देणार पैसाच पैसा; ‘या’ तीन राशींवर शुक्र-गुरूची होणार कृपा
Gold Silver Rate Today 9 December 2024
Gold Silver Rate Today : आज सोनं स्वस्त झालं की महाग!आठवड्याभरात दरात नेमकं काय झाले बदल? जाणून घ्या
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७५,९२० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६९, ५९३ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९१० रुपये आहे तर १ किलो चांदी ९१,०४० रुपयांनी विकली जात आहे.
या दरवाढीमुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूरसारख्या शहरांमध्येही सोन्या-चांदीच्या दरात बदल झाले आहेत.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,४७४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,७९० रुपये आहे.
पुणेप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,४७४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,७९० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,४७४ रुपये आहे.२ कॅरेट सोन्याचा दर ७५,७९० रुपये आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,४७४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,७९० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader