Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Today’s Gold Silver Rate :  महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल आज म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत. मात्र निवडणुकीच्या निकालापूर्वी सोन्याचे भाव दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत, किमती वाढण्यामागचे खरे कारण म्हणजे रशिया- युक्रेन युद्ध. यानंतर देशातील सोन्याचे दर वाढू लागले आहेत. दरम्यान भारतीय सराफा बाजारात शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, देशातील सोन्या- चांदीचे दर उच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. आठवड्याभरात सोन्याचे दर ७४ हजार रुपयांवरुन ७८ हजारांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर ८९ हजारांवरुन ९१ रुपयांवर पोहोचले आहेत.

आज २३ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७८, ०५० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९१,२२० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याचा दरात गेल्या आठवड्याभरात ४००० हजारांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर ८९ हजारांवरुन ९१ हजारांवर

ते ७६ हजार रुपयांवर दरम्यान वाढत आहे. तर चांदीचे दर ८२ हजार रुपयांवरुन थेट ९१ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवशी सोनं-चांदीचे दर वाढल्याने आता चिंता व्यक्त केली जात आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,४१८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,९१० रुपये आहे.
पुणेप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,४१८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,९१० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,४१८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,९१० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,४१८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,९१० रुपये आहे.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader