Today’s Gold Silver Rate : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी २०२५ रोजी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली, सोन्याचा भाव ८२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमवरुन थेट ८३ हजारांवर जाऊन पोहोचला. तर चांदीचा दर १ किलो चांदीचा दर थेट ९४ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पानंतर सोन्या-चांदीच्या दरात घट होईल या आशेवर असलेल्या लोकांचा हिरमोड झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात नेमका बदल झाल, तसेच आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घेऊ.

इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज ४ फेब्रुवारी रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ८३, २४० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९४,५४० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचे दर ७६ हजार ३०३ रुपये झाला आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याचा दरात गेल्या आठवड्याभरात २००० हजारांची वाढ झाली आहे. तर चांदीचे दर ३००० वाढले आहेत. कालच्या तुलनेत म्हणजे ३ जानेवारी रोजी सोन्याचा दर ११० रुपयांनी घटला तर चांदी दर १० रुपयांनी कमी झाला आहे.

अर्थसंकल्पादिवशी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ८२, ५२० रुपये होता. तर १ किलो चांदीचा दर ९३,९१० रुपये होता.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७६,१४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८३,०७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,१४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८३,०७० रुपये आहे.
नागपूर२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,१४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८३,०७० रुपये आहे.
नाशिक२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७६,१४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८३,०७० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.