Gold Silver Price Today : गेल्या महिन्यात सोने चांदीच्या दरात अस्थितरता दिसून आली. ऑगस्ट महिन्यात सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून आले. रविवारी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी मात्र सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आणि ग्राहकांना दिलासा मिळाला. आज पोळ्याच्या दिवशी सोने चांदीच्या दर कसे आहेत, हे जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६५८८१ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७१,८७० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८५१ रुपये आहे म्हणजेच चांदी ८५,०९० रुपये किलोनी विकली जात आहे.

रविवारी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण दिसून आली. १ सप्टेंबर २०२४ चा सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ७१,८७० रुपये होता आणि चांदीचा दर ८५,०८० रुपये प्रति किलो होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोन्याच्या दरात चढ उतार झालेली नसून चांदी फक्त दहा रुपयांने वाढली आहे.

हेही वाचा : भारताच्या ‘फिनटेक’ वैविध्याचा जगाला मोह – पंतप्रधान

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७६२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver price today maharashtra gold rate nashik pune mumbai nagpur 2 2024 gold rate latest rate of gold silver ndj