Gold Silver Rate Today 7 February 2025 : आजपासून प्रेमाचा आठवडा सुरू झाला आहे ज्याला आपण ‘व्हॅलेंटाईन वीक’ म्हणतो. या आठवड्यात लोक जोडीदाराविषयी प्रेम व्यक्त करतात. एकमेकांना फुले, पु्ष्पगुच्छ तसेच भेटवस्तू देतात. व्हॅलेंटाईन वीकमध्ये अनेक जण महागड्या सोने चांदीच्या वस्तू, दागिने सुद्धा गिफ्ट करतात. व्हॅलेंटाईन वीकच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात चांगलीच वाढ दिसून येत आहे. लोकांचा खरेदीकडे कल वाढल्याने सोने चांदी महागलेले दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८४,७८० रुपये तर चांदीचा दर ९६,१७० रुपये किलो आहे. तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तर आजचा तुमच्या शहरातील सोने चांदीचा दर कसा आहे, जाणून घेऊ या.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७७,७१५ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ८४,७८० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९६२ रुपये आहे म्हणजेच चांदी ९६,१७० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७७,५९६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८४,६५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७७,५९६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८४,६५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७७,५९६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८४,६५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७७,५९६ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ८४,६५० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

एका महिन्यापूर्वी १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७८,००० रुपये होता तर चांदीचा तर ९१,०६० रुपये होता. तसेच, एका आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ८२, ३१० रुपये होता तर चांदीचा दर ९४,२६० रुपये होता.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.