Today Gold Silver Price : गणेशोत्सवानंतर आता सर्वांना वेध लागले ते नवरात्रीचे. या सणासुदीच्या दिवसात अनेकजण सोने- चांदी खरेदी करतात. मात्र गणशोत्सवापासून सातत्याने वाढत आहेत.सध्या २४ कॅरेट सोनं ७५ हजार पार गेलं आहे, तर चांदीचा दरही ९१ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे तुम्ही जर सोने- चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या शहराकील दर जाणून घेणे महत्वाचे आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात कालच्या तुलनेत आज १०० रुपयांची वाढ झाली असून चांदी ५५० रुपयांनी महाग झाली आहे. त्यामुळे नवरात्री, दसरा, दिवाळीनिमित्त तुम्ही सोनं- चांदी खरेदी करणार असाल तर एकदा आजचे दर वाचाच.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 1 October 2024)
आज १ ऑक्टोबर रोजी देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७५,७५० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९१,२३० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात ३०० ते ४०० रुपयांच्या दरम्यान चढ-उतार दिसून आले, पण चांदीच्या दरात आठवड्याभरात १००० रुपयांची घसरण दिसून आली.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार,आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७५,७५० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६९, ४३८ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९१२ रुपये आहे तर १ किलो चांदी ९१,२३० रुपयांनी विकली जात आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे दर वाढले आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही दरात वाढ झाली आहे.
आदल्या दिवशीचा म्हणजे ३० सप्टेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७५, ६५० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९०,६८० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्या-चांदीचे दर सातत्याने कसे चढ- उतार होत आहेत.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,३०९ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,६१० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,३०९ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,३०९ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,३०९ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,६१० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.