Today Gold Silver Price :  देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहे.नवरात्री नंतर दसरा, दिवाळी आणि धनत्रयोदशी असे मोठे सण अवघ्या दिवसांवर येऊन ठेपले आहे. या काळात लोक मोठ्याप्रमाणात सोनं-चांदी खरेदी करतात, पण या सणासुदीच्या काळाला सुरुवात होत नाही तोवर सोन्या-चांदीच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडल्याचे पाहायला मिळत आहे. प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर आज ७६ हजारांवर जाऊन पोहोचला आहे. तर प्रति किलो चांदी ९३ हजार झाली आहे. यामुळे आता ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं-चांदी खरेदी करावं की नाही असा प्रश्न पडला आहे. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्याचे दर काय आहेत जाणून घेऊ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज 5 ऑक्टोबर रोजी देशात सलग दुसऱ्या दिवशी सोने- चांदीचे दर स्थिर असल्याचे दिसून आले. मात्र हे दर स्थिर असले तरी यात झालेली वाढ ही खूप मोठी आहे, देशात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच दर ७६,२५० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९३,५७० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याच्या दरात सतत १००० ते २००० रुपयांच्या दरम्यान चढ-उतार दिसून येत आहे, तर चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणं आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात आहे.

हेही वाचा – Konkan Railway Recruitment 2024 : कोकण रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 5 October 2024)

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७६,२५० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६९, ८९६ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९३६ रुपये आहे तर १ किलो चांदी ९३,५७० रुपयांनी विकली जात आहे. आदल्या दिवशीचा म्हणजे ४ सप्टेंबर २०२४ रोजी देखील हेच दर होते.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,७६८
रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,११० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७६८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,११० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,७६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,११० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver price todays 5 october 2024 rate of gold silver gold rate in mumbai pune nashik nagpur here are latest prices of gold silver during dussehra diwali 2024 sjr