Gold Silver Price Today : सोने चांदीच्या दरातील लहान मोठ्या घडामोडीकडे ग्राहकांचे लक्ष असते. दिवाळी दरम्यान सोने चांदीचे भाव खूप वाढले होते. त्यामुळे सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता पण आता सोने स्वस्त झाले आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे या आठवड्यात ग्राहक सोने खरेदी करताना दिसू शकतात.

आजचा सोने चांदीचा दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६८,१७३ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७४,३७० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ८९३ रुपये आहे म्हणजेच चांदी ८९,२६० रुपये प्रति किलो आहे.

women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Trupti Khamkar told why a Marathi actress was given the role of a woman working maid in Hindi movie
…म्हणून मराठी अभिनेत्रींना हिंदीत दिलं जातं कामवाल्या बाईचं काम, तृप्ती खामकरने सांगितलं पडद्यामागचं सत्य
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
ऑक्टोबरमध्ये निर्यातीत १७.२५ टक्के वाढ
Hemant Godse On Chhagan Bhujbal :
Hemant Godse : महायुतीत धुसफूस? शिंदे गटाच्या नेत्याचा छगन भुजबळांवर गंभीर आरोप; म्हणाले, ‘पाठीत खंजीर खुपसला’
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा : भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

u

एका आठवड्यापूर्वी सोने चांदीचा दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, एका आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७७,५७० रुपये होता, याशिवाय चांदीची किंमत ९१,६०० रुपये प्रति किलो होती. एका आठवड्यात सोन्याच्या दरात ४.१३ टक्के घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात २.५५ टक्के घसरण झाली आहे.

एका महिन्यापूर्वी सोने चांदीचा दर

एका महिन्यापू्र्वी २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७६,८१० रुपये होता, याशिवाय चांदीची किंमत ९२,३३० रुपये प्रति किलो होती. सोन्याच्या दरात एका महिन्यात ३.१८ टक्के घसरण झाली आहे तर चांदीच्या दरात ३.३३ टक्के घसरण झाली आहे.

१ नोव्हेंबर रोजी दहा ग्रॅम सोन्याचा दर ७८,८६७ रुपये होता आणि गुरुवारी सोन्याचा दर ७३,७५० रुपये होता. या १५ दिवसांमध्ये सोन्याच्या दरात पाच हजार रुपयांची घसरण दिसून आली.

हेही वाचा : भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.