Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या- चांदीच्या दरात सातत्याने घसरण सुरु आहे , त्यामुळे ग्राहकांना लग्नसराईच्या दिवसात स्वतात सोनं खरेदी करण्याची संधी चालून आली आहे. गेल्या आठवड्याभरापूर्वी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर जवळपास ७९ हजारांवर जाऊन पोहोचला होता, मात्र हाच दर आता ७५ हजारांच्या आसपास आला आहे. तर चांदीचा दर ९४ हजारांवरुन आता थेट ८९ हजारांवर येऊन स्थिरावला आहे. तसेच कालच्या तुलनेत आजही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते स्थानिक बाजारापर्यंत सर्वच सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे.त्यामुळे तुम्ही पण सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचे दर जाणून घ्या.

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 12th November 2024)

16 December 2025 Latest Petrol Diesel Price
Petrol And Diesel Rate: महाराष्ट्रात वाढला इंधनाचा भाव? तुमच्या शहरांत पेट्रोल-डिझेलसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या
Gold imports down by 5 billion print eco news
सोन्याची आयात ५ अब्ज डॉलरने कमी; सरकारची नोव्हेंबर महिन्याची सुधारित आकडेवारी समोर

आठवड्याभरापासून सोन्या-चांदीचे दर घसरत असल्याने ग्राहक दिलासा व्यक्त करत आहेत. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७५,४३० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८८,८३० रुपये आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,१४४ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीचा दर ८८८ रुपये आहे. आज सोन्याचा दर १८० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ६३० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोनं जवळपास ३ हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर १८० रुपयांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ९५ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज जवळपास ५८०० रुपयांनी कमी झाला आहे. तर आदल्या दिवशीच्या तुलनेत हा दर ६३० रुपयांनी घसरला आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही दरात घसरण झाली आहे. (Today’s Gold Silver Rate

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 12 November 2024)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,०७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,३५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,३५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,३५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,०७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,३५० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Story img Loader