Gold Silver Rate Today 18 November 2024 :  दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महिन्याभरापूर्वी ७७ हजारांवर पोहोचलेला सोन्याचा दर आता ७४ हजारांवर येऊन पोहोचला आहे. ऐन लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचे दर गडगडल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे, आजही २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा जवळपास ६०० रुपयांची घट झाली आहे. तर चांदीचा दरही ५०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे तुम्ही पण सोने खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत नक्की जाणून घ्या.

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 18th November 2024)

आठवड्याभरापासून सोन्या-चांदीच्या दरातील घसरण ग्राहकांसाठी मोठ्या फायद्याची ठरत आहे. कारण लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. वधु वराचे दागिने खरेदी करण्यासाठी सोन्याच्या दुकांनांमध्ये लगबग दिसून येत आहे. अशात सोन्याचे दर कमी झाल्याने ग्राहकही दिलासा व्यक्त करत आहेत. बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,८५० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८९,६१० रुपये आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,६१३ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीचा दर ८९६ रुपये आहे. आज सोन्याचा दर तब्बल ५९० रुपयांनी कमी झाला आहे. तर चांदीच्या दरात ५०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी चालून आली आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?

एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोनं जवळपास १२०० हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर ५९० रुपयांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ८९ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज २०० रुपयांनी कमी झाला आहे. तर आदल्या दिवशीच्या तुलनेत हा दर ५०० पयांनी घसरला आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहे. (Today’s Gold Silver Price)

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 18 November 2024)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६८,५४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७४,७८० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,५४८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७८० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)