Gold Silver Rate Today 2 December 2024 : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ- उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्या चांदीच्या घरात मोठी घट झाली होती. आठवड्याभरापूर्वी सोनं ७५ हजारांपर्यंत स्वस्त झालं होते. पण दर पुन्हा वाढून ७८ हजारांपर्यं जाऊ पोहोचला. पण आज डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याट – चांदीचे दर पुन्हा कमी झाले आहे, आज २ डिसेंबर रोजी देशात २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर ७६,२२० रुपये आहे. १ डिसेंबरच्या तुलनेत हे दर ८०० रुपयांनी कमी झाले आहे. तर चांदीच्या दरातही जवळपास ११०० रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोन्या-चांदीचे दर घटल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे. आज महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह काही प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचा दर नेमका का आहे, आपण सविस्तर जाणून घेऊ…
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 2 December 2024)
इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज २ डिसेंबर २०२४ रोजी देशातील सोन्या- चांदीचे दर निच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७६,२२० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८९,६३० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,८६८ रुपये आहे. १ डिसेंबरच्या तुलनेत आज सोनं जवळपास ८०० रुपयांनी स्वस्त झालं आहे, याशिवाय १ किलो चांदीच्या भाव आज ११९० रुपयांनी कमी झाला आहे.
२४ नोव्हेंबरला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७७,०२० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९०, ८२० रुपये इतका होता. त्यामुळे कालच्या तुलनेत झालेली मोठी घट ग्राहकांसाठी दिलासाजनक आहे. आज तुमच्या शहरात २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर नेमका का आहे पाहू..
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 2 December 2024)
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,९३३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,२९० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९३३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,२९० रुपये इतका आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९३३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,२९० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९३३ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,२९० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
हेही वाचा – PAN 2.0 Apply Online: नवीन पॅन कार्ड काही मिनिटांत येईल तुमच्या ईमेलवर; फक्त फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस
u
u