Gold Silver Rate Today 25 November 2024 : महाराष्ट्र, झारखंडमधील निवडणुक निकालानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज सोमवारी २५ नोव्हेंबर रोजी सोन्या- चांदीचे दर जवळपास १ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. १८ नोव्हेंबरपासून २४ नोव्हेंबरपर्यंत सततच्या भाववाढीनंतर २५ नोव्हेंबरला सोन्याचा दर खाली आला आहे. तर चांदीही १ हजार रुपयांपेक्षा अधिक दराने स्वस्त झाली आहे.आज भारतात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ७६ हजारापर्यंत आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या हंगामात सोन्या चांदीच्या दरातील चढ उतारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. येत्या काही दिवसांत सोने आणि चांदी आणखी महाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशात तुम्ही सोन्या- चांदीचे दागिने खरेदी करणार असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या…
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 25 November 2024)
इंडिया बुल्स वेबसाईटनुसार, आज देशातील सोन्या- चांदीचे दर निच्चांक पातळीवर पोहोचले आहेत. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७६,८८० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ८६,६४० रुपये आहे. २४तर २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,४७३ रुपये आहे. नोव्हेंबरच्या तुलनेत आज सोनं जवळपास ११८० रुपयांनी स्वस्त झालं आहे, याशिवाय १ किलो चांदीच्या दर आज ८९, ६०० रुपये आहे. अशाप्रकारे चांदीच्या दरातही तब्बल १६३० रुपयांची घट झाली आहे.
२४ नोव्हेंबरला १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७८,०६० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९१, २३० रुपये इतका होता. त्यामुळे कालच्या तुलनेत झालेली मोठी घट ग्राहकांसाठी दिलासाजनक आहे. आज तुमच्या शहरात २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा दर नेमका का आहे पाहू..
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today 25 November 2024)
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,३८२ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,७८० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,३८२ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,७८० रुपये इतका आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,३८२ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,७८० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,३८२ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,७८० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)