Gold-Silver Price Today:  निवडणूकी निकालाच्या आधीच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोमवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,४४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,८८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,२८० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९१,९२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. 

indian economy world bank
जागतिक बँकेची भारतावर स्तुतिसुमनं; अध्यक्ष म्हणाले, “इथपर्यंत पोहोचण्यासाठी भारतानं खूप प्रयत्न केल्याचं दिसतंय”!
S&P Global Report on India Economy to 2030
भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थसत्ता; एस…
Sensex falls by 494 degrees due to withdrawal of foreign investors
परदेशी गुंतवणूकदारांच्या माघारीने ‘सेन्सेक्स’ची ४९४ अंशांची गाळण
182 percent increase in direct tax collection over a decade news
प्रत्यक्ष कर संकलनांत दशकभरात १८२ टक्क्यांची वाढ; कर महसूल १० वर्षांत वाढून १९.६० लाख कोटींवर
Profit of information technology leader Wipro Infosys
‘आयटी’ कंपन्यांची तिमाही कामगिरी रुळावर; इन्फोसिसला ६,५०६ कोटी, तर विप्रोला ३,२०९ कोटींचा नफा
Investors turn their backs on Hyundai Motor India IPO which is selling shares print eco news
‘ह्युंदाई’च्या समभागांकडे छोट्या गुंतवणूकदारांची पाठ; ‘आयपीओ’त निम्माच भरणा पूर्ण
Danish Power largest share sale in the SME sector since October 22
डॅनिश पॉवरची २२ ऑक्टोबरपासून ‘एसएमई’ क्षेत्रातील सर्वात मोठी भागविक्री
waaree Energies IPO from October 21 at Rs 1427 to Rs 1503 each print eco news
वारी एनर्जीजचा प्रत्येकी १,४२७ ते १,५०३ रुपये किमतीला ‘आयपीओ’ २१ ऑक्टोबरपासून
Mumbai stock market index Sensex falls
‘निफ्टी’ २५ हजारांखाली; ‘सेन्सेक्स’मध्ये तीन शतकी घसरण

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,३६८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,३१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३६८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३१० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३६८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३१० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३६८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,३१० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.