Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,४०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५७,८८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७१,३५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६९,०६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५४,४५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,४०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,४५० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,४०० रुपये आहे.

Nine official ration shops suspended due to complaints of looting food grains from people shares
‘मापात पाप’ करणाऱ्या शिधावाटप दुकानदारांवर कारवाई
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
12th October 2024 Petrol diesel price in marathi
Petrol Diesel Rates Today : आज दसऱ्याच्या मुहूर्तावर वधारला का पेट्रोल-डिझेलचा भाव? तुमच्या शहरांत किती रुपये मोजावे लागणार?
agriculture benefit for traders and sellers in rbi report
शेती शेतकऱ्यांच्या नव्हे व्यापारी, विक्रेत्यांच्या फायद्याची ? जाणून घ्या, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालातील धक्कादायक माहिती
amazon india announces significant reduction in selling fees
ॲमेझॉनकडून विक्रेत्यांच्या शुल्कात कपात; दिवाळीच्या तोंडावर पाऊल; राज्यातील १ लाख ८० हजारांना फायदा
Musheer Khan Road Accident Health Update His Car Overturned After Hitting Divider
Musheer Khan Health Update: मुशीर खानचा अपघातही ऋषभ पंतप्रमाणेच, अधिकृत माहिती आली समोर, मानेला फ्रॅक्चर असून मुंबईत होणार पुढील उपचार
redevelopment of thousands of residential houses in Uran stalled due to notification of Navys security belt
नौदलाच्या सुरक्षा पट्ट्यामुळे पुनर्विकासाची ‘रखडपट्टी’संरक्षणमंत्र्यांना साकडे घालूनही ३२ वर्षांपासून प्रतीक्षाच
9 out of 10 people make losses in F&Os according to a report by capital markets regulator SEBI
‘एफ अँड ओ’मध्ये १० पैकी ९ जण तोट्यात; भांडवली बाजार नियंत्रक सेबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव उघड

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.