Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज शनिवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,७८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,६१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८७,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८९,१९० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold Silver Price Today Dhanteras 2024 in Marathi
Gold Price Today : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा दर किती? जाणून घ्या, सोने चांदीचा भाव एका क्लिकवर
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Gold Silver Price 28 october
Gold Silver Price 2024 : धनत्रयोदशीच्या एक दिवसापूर्वी एवढा आहे सोन्याचा दर, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचा भाव
Gold Price Today sunday 27 october before Diwali 2024
Gold Price Today: दिवाळीच्या आधीच सोन्याने गाठला ८० हजाराचा टप्पा, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर
gold silver rate fell down before diwali 2024
Gold Silver Rate Today : ग्राहकांना दिलासा! दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भाव काय?
Gold Silver Today's Rate
Gold Silver Rate : सोनं ७८ हजारांच्या पार! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या चांदीचा दर
Gold and silver prices hike
Gold & Silver Prices Surge : चांदी लाखमोलाची; सोन्याची आगेकूच सुरूच
gold and silver price incresed during festive sesson
सोने, चांदीच्या भावात वाढ होण्याची कारणे अन् आगामी काळात भाव कमी होणार का? जाणून घ्या…

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,६७९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,६५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६७९ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.