Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. वायदे बाजारातही सोन्या चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आहे. ऐन लग्नसराईत सोन वाढत असल्याने सोन्याची खरेदी करण्याऱ्यांसाठी चिंता निर्माण झाली आहे. चांदीच्या फ्युचर्सने बुधवारी सुमारे ११ वर्षातील त्यांचा सर्वोच्च सेटलमेंट पोस्ट केला. चांदीच्या दरात सर्वात मोठी वाढ दिसून आली. यूएस सरकारच्या डेटाने चलनवाढीचा दर मंदावल्याचा खुलासा केल्यानंतर, या वर्षी व्याज-दर कपातीच्या अपेक्षा पूर्ण केल्या, सोन्याच्या फ्युचर्सने तीन आठवड्यांपेक्षा जास्त उच्चांक गाठल्याचे दिसून आले. आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात सोन्या आणि चांदीच्या वायदे दरांमध्ये तेजी दिसत असून दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. आज गुरुवारी सुद्धा सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चला तर जाणून घेऊया आजचे दर काय…

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७३,४४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,२८० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८७,३७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८५,३६० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Wholesale Price Inflation Climbs to 2.37 percent in December 2024
घाऊक महागाई वाढली; अन्नधान्यांच्या किमतीमुळे नव्हे तर…; महागाई दर डिसेंबरमध्ये वाढून ….
Stock market hits 650-point high with Sensex
मार्केट-वेध : सेन्सेक्स सावरला; पण बाजारातील तेजीचे पतंग काटले जाणार की, मोठी भरारी घेणार?
Gold Silver News
Gold Silver Price Today : मकर संक्रांतीच्या दिवशी सोने खरेदी करताय? जाणून घ्या, तुमच्या शहरातील आजचा सोने चांदीचा भाव
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
gold silver rate today, Gold Silver Price 11 january 2025
Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरातील वाढ सुरूच, आज २२, २४ कॅरेट सोन्याचा दर काय? जाणून घ्या

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६७,२१० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,३२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२१० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३२० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२१० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३२० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६७,२१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७३,३२० रुपये आहे.

पाहा तुमच्या शहरातील चांदीचा दर

मुंबईमध्ये चांदी ८७,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. पुण्यात ८७,२५० रुपये प्रति किलो, नागपूरमध्ये ८७,२५० तर नाशिकमध्ये ८७,२५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader