Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं चढउतार उतार होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी सोन्याच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी सोन्याच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळालं आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,६५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,९४० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,९७० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९०,५०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold Silver Price Today 20 November 2024 in Marathi| maharashtra election result 2024
Gold Silver Price Today : महाराष्ट्र निवडणुक निकालापूर्वी सोन्याच्या दरात मोठी वाढ; खरेदी पूर्वी जाणून घ्या आजचे दर
wipro bonus share issue
‘विप्रो’कडून बक्षीस समभाग पात्रतेसाठी ३ डिसेंबर रेकॉर्ड तारीख…
stock market updates
बाजाराच्या आकस्मिक मुसंडीमागे, मतदानोत्तर चाचण्यांचा ‘कौल’?
adani group misled indian capital market
अदानींकडून भारताच्या भांडवली बाजाराचीही दिशाभूल?
sebi rules violation loksatta news
‘सेबी’कडून प्रकटन नियमाच्या उल्लंघनाची चौकशी
Ola Electric Plans 500 Job Cuts Amid Mounting Losses
‘ओला इलेक्ट्रिक’कडून ५०० कर्मचाऱ्यांची कपात
us allegations may affect credibility of adani companies
आरोपांमुळे अदानी कंपन्यांवरील विश्वासार्हतेवर परिणाम शक्य : एस ॲण्ड पी
silver outshines gold with over 20 percent returns in 6 months
‘सिल्व्हर ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरअखेर मालमत्ता १२,३३१ कोटींवर; परताव्यात ‘गोल्ड ईटीएफ’ला मात
stock market update sensex surges by 1961
Stock Market Update :‘सेन्सेक्स’ची १९६१ अंशांची जोरदार मुसंडी

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,४७७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,५२० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,४७७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५२० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,४७७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५२० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,४७७ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,५२० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.