Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आता एप्रिल महिना सुरू झाला असून सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्वात महत्त्वाच्या मौल्यवान धातूंमध्ये गणल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीच्या किमतीत जबरदस्त वाढ झाली असून सोन्या-चांदीने नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात नव्या ऐकतिहासिक उच्चांकावर केली आहे. आज, १ एप्रिल रोजी सोन्या बरोबरच चांदीच्या किमतीने नवीन उच्चांकावर उडी घेतली आहे.
बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ८१,८८६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ८९,३३० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदी १००,३०० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८१,७३९ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ८९,१७० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८१,७३९ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१७० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८१,७३९ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१७० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८१,७३९ रुपये आहे. | ४ कॅरेट सोन्याचा दर ८९,१७० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.
२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.
२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.
२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.
१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.
१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.