Gold Silver Price Today : सध्या सगळीकडे लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरामध्ये चढ उतार दिसून येत आहे. आज आठवड्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी सोने चांदीच्या दरात घसरण दिसून आली. त्यामुळे आज जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण सोने चांदीचा दर जाणून घेऊ या. (Gold Silver rate down today 16 December 2024 Check Here latest prices of your city)
सोने चांदीचे दर
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७०,६७५ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७७,१०० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९०८ रुपये आहे म्हणजेच चांदी ९०.७८० रुपये प्रति किलो आहे. आज सोने १५० रुपयांनी स्वस्त झाले आहे तर चांदी १७० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
एक आठवड्यापूर्वी २४ कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचा दर ७७,५७० रुपये होता तर चांदीचा दर ९५,०१० रुपये प्रति किलो होता.
हेही वाचा : सरकारी बँकांना सहामाहीत ८६ हजार कोटींचा निव्वळ नफा
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,५३० रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७६,९३० रुपये आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,५५६ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७६,९७० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
हेही वाचा : Gold Silver Rate Today : आठवड्याभरात कसे बदलले सोन्या-चांदीचे दर; आज २४ कॅरेटचा रेट काय आहे? इथे करा चेक
सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा असतो?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.