Gold Silver Price Today : देशभरात सध्या दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने अनेक ग्राहक सोने- चांदी खरेदी करण्यास पसंती देतात. त्यामुळे सराफ बाजारातही दिवाळीत सोनं चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली. पण दिवाळीनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिवाळीनंतर तरी का होईना दिलासा मिळत आहे. आठवड्याभरात ८० हजारांपर्यंत पोहोचलेला सोन्याचा दर आता ७८ हजारांवर आला आहे.तर १ लाख रुपयांपर्यंत पोहोचलेली चांदी आज ९४ हजार रुपयांवर आली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सोने- चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 5th November 2024)

दिवाळीनंतर सोनं- चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे,कारण सलग दुसऱ्या दिवशी सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार,आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६१० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९४,४९० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचा दरात जवळपास ८०० रुपयांची घसरला आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर ५० रुपायांनी कमी झाला आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ९९ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज जवळपास ४५५० रुपयांनी कमी झाला आहे.तर आदल्या दिवशीच्या तुलनेत चांदी ४० रुपयांनी स्वस्त झाली आहे, यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही दरात घसरण झाली आहे. (Today’s Gold Silver Rate)

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,९०३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,४४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,९०३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,९०३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,९०३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,४४० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

आदल्या दिवशीचा म्हणजे ३० ऑक्टोबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,६१० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९४,४९० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्या-चांदीचे दर सातत्याने कसे चढ- उतार होत आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver rate falls down in india after diwali 4check 24 carat price in your city on 5th november sjr