Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार पाहायला मिळत आहे. पण यात ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे आठवड्याभरापूर्वी ७९ हजारांपर्यंत पोहोचलेला सोन्याचा दर आता ७७ हजारांवर येऊन ठेपला आहे, तर चांदीचे दरही जवळपास ३००० हजारांनी कमी झाला आहे. त्यामुळे आता लग्नसराईत सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीप्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे. तुम्ही देखील सोनं- चांदी खरेदीचा विचार करत असाल तर आज तुमच्या शहरात नेमके काय दर आहेत जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत? (Gold-Silver Price On 10th November 2024)

आठवड्याभरापासून सोन्या- चांदीच्या दरातील घसरण पाहता ग्राहकांना दिलासा मिळत आहे. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार,आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,५८० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९१,६१० रुपये आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,११५ रुपये आहे. तर १० ग्रॅम चांदीचा दर ९१६ रुपये आहे.

एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास सोन्याचा दर जवळपास दीड हजार रुपयांनी घसरला आहे, तर आदल्यादिवशी तुलनेत हा दर स्थित आहे. त्याचप्रमाणे आठवड्याभरापूर्वी ९५ हजारांपर्यंत पोहोचलेला चांदीचा दर आज जवळपास ४१५० रुपयांनी कमी झाला आहे.तर आदल्या दिवशीच्या तुलनेत हे दर स्थिर आहे. यामुळे मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्येही दरात घसरण झाली आहे. (Today’s Gold Silver Rate

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७०,९८७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७७,४४० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,९८७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,४४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,९८७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,४४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७०,९८७ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७७,४४० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver rate falls down in india check 24 carat price in your city on 10th november sjr