Gold Silver Rate: आज सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे, तर काल त्यांच्या दरात घट झाली होती. इस्रायल-हमास युद्धामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला व्याजदरांबाबत कठोर निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता असून, त्याचा नकारात्मक परिणाम डॉलरच्या दरावर होण्याची चिन्हे आहेत. फेडरल रिझर्व्हने सध्या व्याजदरांबाबत सावध पवित्रा घेतला आहे आणि त्यामुळे डॉलरच्या दरातही चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळेच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वाटचाल करीत असून, याचा फायदा सोने-चांदीला मिळत आहे.

सोन्याच्या दराने चार महिन्यांतील उच्चांक गाठला

कमोडिटी मार्केटमध्ये, MCX वर सोन्याने ४ महिन्यांतील उच्चांक गाठला आहे आणि आज सोन्यामध्ये जबरदस्त वाढ दिसून येत आहे. चांदीच्या दरातही जोरदार व्यवहार होत आहेत.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
A photo representing gold investment.
Gold Investment : सोने गुंतवणूकदारांची चांदी, २०२४ मध्ये मिळवला २७ टक्के परतावा; भविष्यातही सोने चकाकणार

MCX वर सोन्याचे भाव कसे आहेत?

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याने ४ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. सोन्याच्या दरात २७७ रुपयांची म्हणजेच ०.४६ टक्क्यांनी वाढ झाली असून, त्याचा भाव ६०५९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आला आहे. आज सोन्याचा दर ६०६६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. सोन्याच्या या किमती त्याच्या डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत.

हेही वाचाः Money Mantra : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, दर महिन्याला मोठं उत्पन्न मिळणार; नेमके कोणते फायदे होणार?

MCX वर चांदीचे भाव कसे आहेत?

आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीचा भावही चांगलाच तेजीत आहे. चांदीचा दर २८३ रुपये म्हणजेच ०.४० टक्क्यांनी वाढून ७१८९९ रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा भाव ७२१६४ रुपये प्रति किलोवर गेला होता. चांदीच्या या किमती त्याच्या डिसेंबरच्या फ्युचर्ससाठी आहेत.

हेही वाचाः टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरानं डोळ्यांत आणले अश्रू, घाऊक बाजारात आठवड्याभरात ३० टक्क्यांची वाढ

आज किरकोळ बाजारात सोन्याचे भाव कसे आहेत?

किरकोळ बाजारातही सोन्याचा भाव प्रचंड वाढीसह व्यवहार करीत आहे आणि ८२० रुपयांपर्यंतची वाढ दिसून येत आहे, ज्यामुळे ते ६२ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते.

किरकोळ बाजारात सोन्याचे भाव

दिल्ली: २४ कॅरेट शुद्ध सोने ७८० रुपये प्रति १० ग्रॅमच्या वाढीसह ६१६९० रुपये आहे.
मुंबई : २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७७० रुपयांच्या वाढीसह ६१५३० रुपयांवर पोहोचला आहे.
चेन्नई: २४ कॅरेट शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ८२० रुपयांच्या वाढीसह ६१७५० रुपयांवर आहे.
कोलकाता: २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७७० रुपयांच्या वाढीसह ६१५३० रुपयांवर पोहोचला आहे.
अहमदाबाद : २४ कॅरेट शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ७७० रुपयांच्या वाढीसह ६१५८० रुपयांवर पोहोचले आहे.
बेंगळुरू: २४ कॅरेट शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ७७० रुपयांच्या वाढीसह ६१५३० रुपयांवर आहे.
हैदराबाद: २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ७७० रुपयांच्या वाढीसह ६१५३० रुपयांवर पोहोचला आहे.
जयपूर : २४ कॅरेट शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ७८० रुपयांच्या वाढीसह ६१६९० रुपयांवर पोहोचले आहे.
लखनौ: २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८० रुपयांच्या वाढीसह ६१६९० रुपयांवर पोहोचला आहे.
सूरत: २४ कॅरेट शुद्ध सोने प्रति १० ग्रॅम ७७० रुपयांच्या वाढीसह ६१५८० रुपयांवर आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५५,५५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ६०,६०० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,५५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,६०० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,५५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,६०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,५५० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,६०० रुपये आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीचे भाव कसे आहेत?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस १९७६ डॉलरच्या पुढे जात आहे आणि नजीकच्या काळात त्याची किंमत १९८० प्रति डॉलर औंस दिसण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते जागतिक बाजारात सोने प्रति औंस १९८० डॉलरच्या पुढे गेले तर ते २०१० डॉलर किंवा २०२५ प्रति औंस डॉलरपर्यंत जाऊ शकते. जागतिक बाजारातील वाढीचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावरही होणार आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

Story img Loader