Gold Silver Rate Today : गुढीपाडवा हा मराठी सण महाराष्ट्रात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी घरांमध्ये गुढी उभारली जाते आणि मराठी नवीन वर्षाची सुरूवात होते. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा (शालिवाहन संवत्सर)पहिला दिवस मानला जातो. हा दिवस वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानला जातो. या दिवस एक शुभ मुहूर्त असतो म्हणून या दिवशी लोक नवीन कामे, नवीन गोष्टी खरेदी करतात. अनेक लोक या दिवशी दागिने खरेदी करतात. यंदा गुढीपाडव्याला तुम्ही सुद्धा सोने चांदीचे दागिने खरेदी करायचा विचार करत असाल तर त्यापूर्वी सोने चांदीचा दर जाणून घ्या.
गुढीपाडव्याच्या तोंडावर सोने चांदीचे दर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. जाणून घेऊ या आज सोने चांदीचे दर किती आहे.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ८०,६७६ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ८८,०१० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९८३ रुपये आहे म्हणजेच चांदी ९८,३०० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८०,४९३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ८७,८१० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,४९३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ८७,८१० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,४९३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर८७,८१० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ८०,४९३ रुपये आहे.४ कॅरेट सोन्याचा दर ८७,८१० रुपये इतका आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

गेल्या महिन्याभरात सोन्याचा दर २.०५ टक्क्यांनी वाढला असून चांदीचा दर १.७३ टक्क्यांनी वाढला आहे.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.