Gold Silver Price : वैदिक कॅलेंडरनुसार, देशभरात धत्रयोदशी २९ ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त १०.३४ वाजता सुरू होणार असून आणि ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १:१७ वाजता समाप्त होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. अनेक जण आवडीने सोने खरेदी करतात. तुम्ही सुद्धा सोने खरेदी करण्याचा विचार करत आहात का? जर हो तर, आजचा सोने चांदीचा दर जाणून घ्या.
गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. अगदी दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदीच्या दराने उच्चांकी गाठली आहे.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७२,२१५ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७८,७८० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९७५ रुपये आहे म्हणजेच चांदी ९७,५२० रुपये प्रति किलो आहे. एक महिन्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ७५, ३३० रुपये होता पण ऐन दिवाळीच्या तोंडावर सोने महागले आहे आणि येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत ८० हजार पार करू शकते, अशी भीती ग्राहकांमध्ये आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Gold Silver Price Today Dhanteras 2024 in Marathi
Gold Price Today : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा दर किती? जाणून घ्या, सोने चांदीचा भाव एका क्लिकवर
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : मुंबईत वाढत्या घरभाड्यांमुळे ‘ब्रेन-ड्रेन’ होतंय, लोक कमावतायत कमी आणि भाडी भरतायत जास्त!

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,६७४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,१९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,६७४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,१९० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,६८३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७८,२०० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,६८३ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,२०० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

हेही वाचा : Gold Silver Price : सोने आणखी महागले! सोन्याचा दर ७९ हजारांवर; जाणून घ्या, खरेदी करण्यापूर्वी तुमच्या शहरातील दर

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.