Today’s Gold Silver Rate : दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे, यासाठी बाजारपेठांमध्येही खरेदीची लगबग सुरु आहे. विशेषत:या काळाच सोने-चांदी खरेदीला विशेष पसंती असते. पण दिवाळीपूर्वीच सोन्या-चांदीच्या किंमतीत आत्तापर्यंतची सर्वात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तुम्ही जर सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणार असाव तर आजचे दर एकदा नक्की पाहा. दिवाळी, धनत्रयोदशी असे विशेष सण आहेत, या काळात सोन्याची मागणी मोठ्याप्रमाणात वाढते त्यामुळे येत्या काही दिवसांत हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…
भारतात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७८,४०० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९८,१९० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याचा दर आता ७६ हजार रुपयांवरुन आज ७८ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. तर १ किलो चांदीचे दरही ९० हजार रुपयांवरुन थेट ९८ हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे, सोनं-चांदी खरेदी येत्या काही दिवसांत असेच वाढत गेले तर ते खरेदी करणं आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाईल.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७८,४०० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७१,८६७ रुपये आहे तर १ किलो चांदी ९८,१९० रुपयांनी विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीचा दर ९८२ रुपये आहे.
आदल्या दिवशी म्हणजे २० ऑक्टोबरला २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७७,७७० रुपये होता. याचा अर्थ आज सोन्याच्या दरात जवळपास ४९० रुपयांची वाढ झाली आहे. तर १ किलो चांदीच दर ९५,४९० रुपये होता, जो आज जवळपास २५२० रुपयांनी वाढून ९८,१९० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर (Gold Silver Rate Today)
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७१,७३८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ७८,२६० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,७३८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,२६० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,७३८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,२६० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,७३८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,२६० रुपये आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.