Today’s Gold Silver Rate : आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. सगळीकडे नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. नवरात्रोत्सवदरम्यान अनेक जण कपडे, दागिने खरेदी करतात. जर तुम्ही आज सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा भाव जाणून घ्या.
सप्टेंबर महिन्यात सोने चांदीच्या दरात अनेकदा चढ उतार दिसून आली. महिन्याच्या अखेरीस सोन्याचे भाव गगनाला भिडले होते त्यामुळे नवरात्रोत्सव-दसरा दरम्यान सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. पण आता ऐन नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे पण चांदीचे दर वाढले आहे.

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६९,८५९ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७६,२१० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९२० रुपये आहे म्हणजेच चांदी ९१,९६० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे. बुधवारी चांदीचा दर ९१,४५० रुपये प्रति किलो होता तर १० ग्रॅम सोन्याचा दर ७६,३९० रुपये होता.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,७६८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६११० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ९१,८६० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,७६२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७४० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.