Gold Silver Price Today : सध्या सागळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. या दरम्यान सोने चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. गणेशोत्सवामध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर मात्र घसरले आहे. तुम्ही जर सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचे सोने चांदीचे दर कसे आहेत, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोने चांदीचे दर

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ६५,८९० रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ७१,८८० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीची किंमत ८३५ रुपये आहे म्हणजेच चांदी ८३,४६० रुपये किलोनी विकली जात आहे.

सोमवारी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर २४ कॅरेटसाठी ७१,८५० रुपये होता आणि चांदीचा दर ८३,४८० रुपये प्रति किलो होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की आज सोने ३० रुपयांनी महागले असून चांदीच्या दरात २० रुपयांची घट झाली आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,७७१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,७५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१०१ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,७५० रुपये आहे.
पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

हेही वाचा : नुसती चांदी! सूर्य, शुक्र आणि केतूच्या युतीमुळे ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?

हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gold silver rate today gauri ganpati gold shopping check gold silver price ndj