Today’s Gold Silver Rate : सणासुदीच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. जर तुम्ही देखील सोन्या-चांदीचे दागिने बनवण्याचा विचार करत असात तर आजचे दर नक्की पाहा, कारण दसऱ्यानंतरही सोन्याच्या दरात आणखी वाढ झाली आहे. यात येत्या काही दिवसात हे दर आणखी वाढू शकतात असे अंदाज वर्तवला जात आहे, कारण दिवाळी, धनत्रयोदशी असे विशेष सण आहेत. या काळात मोठ्याप्रमाणात लोक सोने-चांदी खरेदी करतात. पण आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…

भारतात आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७६, ४३० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९१,८६० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याचा दर आता ७६ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. तर १ किलो चांदीचे दरही ९० ते ९३ हजार रुपयांच्या दरम्यान कमी जास्त होत आहे, सोनं-चांदी खरेदी येत्या काही दिवसांत असेच वाढत गेले तर ते खरेदी करणं आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाईल.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७६,४३० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ७०,०६१ रुपये आहे तर १ किलो चांदी ९१,८६० रुपयांनी विकली जात आहे. १० ग्रॅम चांदीचा दर ९१९ रुपये आहे.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,९३३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७६,२९० रुपये आहे.
पुणेप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९३३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,२९० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९३३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,२९० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६९,९३३ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७६,२९० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

धनत्रयोदशीपूर्वी ‘या’ राशींचे लोक होणार मालामाल, बुधदेवाच्या आशीर्वादाने नोकरीत मिळणार आर्थिक लाभ

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

Story img Loader