Today’s Gold Silver Rate : देशात सध्या सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. या सणासुदीच्या हंगामात तुम्ही सोने – चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण गेल्या काही दिवसांत उच्चांक गाठलेल्या सोने- चांदीच्या दरात आज निवडणूक जम्मू काश्मीर, हरियाणा विधानसभा निकालापूर्वी घसरण झाली आहे. बाजार सुरु होताच सोन्याच्या दर १५० रुपयांनी तर चांदी तब्बल ९६० रुपयांनी स्वस्त झाली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तापर्यंत दरात आणखी कमी व्हावे अशी अपेक्षा आता ग्राहक करताना दिसत आहे. आज तुमच्या शहरात नेमके सोन्या-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊ…

आज ८ ऑक्टोबर रोजी देशात सोने- चांदीचे दर कालच्या तुलनेत काहीप्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. दर घसरले असले तरी आता सोन्या-चांदीचे असलेले दर हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे आहेत. आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ७५, ९८० रुपये आहे, तर १ किलो चांदीचा दर ९१,४७० रुपये आहे. एकूण आठवड्याभराचा विचार केल्यास, सोन्याचा दर ७५ ते ७६ हजार रुपयांवर दरम्यान वाढत आहे. तर चांदीचे दर ८२ हजार रुपयांवरुन थेट ९१ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणं आता सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.

Chief Justice DY Chandrachud on caste discrimination
SC on Cast Discrimination: ‘स्वातंत्र्यानंतरही आपण तुरुंगातील जातीभेद हटवू शकलो नाही’, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केली खंत
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Raghuram Rajan Against Excluding Food Inflation From Interest Rates
व्याजदर निश्चित करताना खाद्यान्न महागाईला वगळणे गैर- रघुराम राजन
Gold Silver Price Today 27 September 2024
Gold Silver Price Today : सोन्या- चांदीच्या किंमतीत घसरण! किती रुपयांनी झाले स्वस्त?जाणून घ्या तुमच्या शहरातील नवीन भाव…
Gold price Today
सोनं महागलं! दहा ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर
Gold and silver prices
Gold Silver Rate : अचानक सोन्या चांदीचे दर घसरले! जाणून घ्या, किती रुपयांनी झाले स्वस्त?
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Voter ID Card Photo Change Process
मतदार ओळखपत्रावरील फोटो बदलायचा आहे? ऑनलाइन बदल करण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, आज देशात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचे दर ७५,९८० रुपये आहे, तर २२ कॅरेटचे दर ६९, ६४८ रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचे दर ९१५ रुपये आहे तर १ किलो चांदी ९१,४७० रुपयांनी विकली जात आहे.

आदल्या दिवशीचा म्हणजे ७ सप्टेंबर २०२४ रोजी १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७६, १३० रुपये होता, तर १ किलो चांदीचा दर ९२,४९० रुपये होता.यावरुन तुमच्या लक्षात येईल की,आज सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहेत.

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार जाणून घेऊया तुमच्या शहरांमधील सोन्या-चांदीचे दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६९,५२० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७५,८४० रुपये आहे.
पुणेप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७५,८४० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५९० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,६२४ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५९० रुपये आहे.

पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की, तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे.जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.