Gold Silver Rate Today 30 January 2024 : सध्या लग्नसराई सुरू असल्याने सोने चांदीच्या दरामध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. लोकांचा खरेदीकडे कल वाढल्याने सोने चांदीचे भाव सुद्धा चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या महिन्याच्या तुलनेत तीन साडेतीन हजाराने सोने महागले आहे. तसेच चांदीच्या दरात सुद्धा झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज सोन्याचा दर ८०,९२० रुपये तर चांदीचा दर ९२,७१० रुपये आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी आजचा तुमच्या शहरातील सोने चांदीचा दर जाणून घ्या.
सोने चांदीचे दर
बुलियन मार्केटनुसार, आज २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याची किंमत ७४,१७७ रुपये आहे तर २४ कॅरेटसाठी ८०,९२० रुपये आहे. याशिवाय, १० ग्रॅम चांदीची किंमत ९२१ रुपये आहे म्हणजेच चांदी ९२,७१० रुपये प्रति किलोनी विकली जात आहे.
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर |
मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ७४,०४८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत ८०,७८० प्रति १० ग्रॅम आहे. |
पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७४,०४८ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८०,७८० रुपये आहे. |
नागपूर | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७४,०४८रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर ८०,७८० रुपये इतका आहे. |
नाशिक | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७४,०४८ रुपये आहे. | ४ कॅरेट सोन्याचा दर ८०,७८० रुपये इतका आहे. |
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
एका महिन्यापूर्वी १० ग्रॅम २४ कॅरेटसाठी सोन्याचा दर ७७,००० रुपये होता तर चांदीचा तर ८७,२८० रुपये होता. तसेच, एका आठवड्यापूर्वी २४ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर ७९,९८० रुपये होता तर चांदीचा दर ९१,२८० रुपये होता.
२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.