अदाणी समूहाच्या नेतृत्वाखालील प्रवर्तक समूहाने अदाणी समूहाची प्रमुख कंपनी अदाणी एंटरप्रायझेसमधील भागीदारी वाढवली आहे. या खरेदीनंतर अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडमधील प्रवर्तक समूहाची भागीदारी ६७.६५ टक्क्यांवरून ६९.८७ टक्के झाली आहे. केम्पास ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड या प्रवर्तक समूह कंपनीकडे सर्वात कमी भागभांडवल आहे. त्यांनी ७ ऑगस्ट ते १८ ऑगस्टदरम्यान खुल्या बाजारातून म्हणजेच शेअर बाजारातून २.२२ टक्के हिस्सा खरेदी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंडेनबर्गनंतर अदाणी समूहातील शेअर्समध्ये घसरण

अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या वतीने जानेवारीमध्ये अदाणी समूहाविरुद्ध अहवाल जारी करण्यात आला होता. यानंतर समूहातील सर्व कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. अदाणी एंटरप्रायझेसचा शेअर १००० रुपयांवर पोहोचला होता. तेव्हापासून त्यात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अदाणी एंटरप्रायझेसचा समभाग सोमवारच्या बंद सत्रात २.३१ टक्क्यांनी वाढून २,६३७ रुपयांवर बंद झाला.

हेही वाचाः भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेचा सरकारबरोबर सामंजस्य करार, ४३५० कोटी महसुलाचे लक्ष्य

GQG पार्टनर्स अदाणी समूहातील भागीदारी वाढवत आहेत

अमेरिकन इन्व्हेस्टमेंट फर्म GQG Partners च्या वतीने अदाणी समूहातील भागभांडवल खरेदी सुरू आहे. अलीकडेच GQG ने अदाणी पोर्टमधील आपला हिस्सा ५.०३ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. अदाणी समूहाच्या १० पैकी ५ कंपन्यांमध्ये GQG पार्टनर्सची हिस्सेदारी आहे. १६ ऑगस्ट रोजी झालेल्या ब्लॉक डीलमध्ये अदाणी पॉवरमधील ७.७३ टक्के हिस्सा GQG ने विकत घेतला होता.

हेही वाचाः Money Mantra : मिडकॅपमध्ये गुंतवणुकीसाठी नवे पर्याय, कमी खर्चात चांगला फायदा कसा मिळवाल? जाणून घ्या

याशिवाय GQG ची अदाणी एंटरप्रायझेस, अदाणी ग्रीन एनर्जी आणि अदाणी ट्रान्समिशनमध्येही भागीदारी आहे. आतापर्यंत GQG ने अदाणी ग्रुपच्या कंपन्यांमध्ये ३८,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. QIO आणि Bain Capital यांचीही अदाणी समूहात गुंतवणूक आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good day for adani group promoter group raises stake in adani enterprises how much benefit for investors vrd
Show comments